नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वीज बिलाच्या आर्थिक वादातून दांम्पत्याने एका महिलेस मारहाण केल्याची घटना रासबिहारी रोडवरील गायत्रीनगर भागात घडली. या घटनेत लाकडी थोपटण्याने मारहाण करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक दौलत कानडे न सोनाली दीपक कानडे (रा. ग्रीनपार्क रोहाऊस, गायत्रीनगर, रासबिहारी रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत गुड्डी कितीर्मान पांडे यानी फिर्याद दाखल केली आहे. पांडे व कानडे दांम्पत्य एकाच रोहाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. लाईट बिलाचे थकीत पैसे मागितल्याने ही घटना घडली. पांडे यांनी सोमवारी (दि. १७) संशयितांकडे पैश्यांची मागणी केली असता संतप्त संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत पांडे यांना मारहाण केली. या घटनेत लाकडी धोपटण्याने मारहाण करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.