नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केले.गंगा आरतीलाही ते हजर होते. पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले; “काशीतील गंगा मातेच्या तीरावरून थेट. १४० कोटी भारतीयांच्या शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ही पहिली भेट वाराणसी येथे होती. या मतदार संघातून ते तीस-यांदा निवडून गेले. पण, ही निवडणूक पंतप्रधान मोदींसाठी एकतर्फी नव्हती. यावेळेस मताधिक्य सुध्दा कमी झाले.