नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील शैक्षणिक वर्ष 2024 25 च्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ९ पैकी ९ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
यामध्ये ३ सिनेट सदस्य व ६ स्टुडन्ट कौन्सिल चे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सह सचिव अशा अनुक्रमे ९ जणांचे पॅनल अभाविपचे बिनविरोध निवडून आले. विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या व अनेक विविध विषयांसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे नेतृत्व असावेत ह्या करता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे दरवर्षी स्टुडन्ट कौन्सिल निवडणुका या होत असतात. यामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या महाविद्यालयांची सूची ही विद्यापीठाकडून जाहीर होत असते व त्या महाविद्यालयातील जनरल सेक्रेटरी मतदानाचा अधिकार असतो.
आज अधिकृत उमेदवारांचे सूची जाहीर करण्यात आली असून यावर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नऊपैकी नऊ उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे कुलगुरू व इतर पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्यात. उमेदवारी अर्ज दाखल करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री शुभंकर बाचल, नाशिक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ उपस्थित होते.