अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हयात दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील १०४ एकर क्षेत्रावर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यात आली होती. लागवड करण्यात आलेला हिरवा चारा कापणीच्या अवस्थेमध्ये असुन ज्या पशुपालकांना चाऱ्याची आवश्यकता असेल अशा पशुपालकांनी प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे), बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संपर्क साधुन हिरव्या चाऱ्याची स्वत: कापणी करुन व प्रती टन १ हजार २०० रुपये रक्कम विद्यापीठाकडे जमा करुन चारा घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.