नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दिडोरीरोड भागातील अशोक मारुती कांबळे (रा. वक्रतुंड हौसिंग सोसायटी, तारवालानगर, पंचवटी) यांची ॲक्टिवा (एमएच १५ एनएच ५६२६) शुक्रवारी (दि.१४) रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरीन नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.
दुसरी घटना पेठरोड भागात घडली. सचिन मुरलीधार बेंडकुळे (रा.दिपलक्ष्मी सोसा.श्रीधर कॉलनी,मेहरधाम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बेंडकुळे यांची स्प्लेंडर एमएच १५ बीक्यू ४२७७ गेल्या शनिवारी (दि.१५) रात्री त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.