जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सगेसोयरे शब्दांमुळे केवळ ओबीसींचेच नाही, तर अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण जाऊ शकते, असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा नेत्यांची मान खाली जाईल, अशी टीका त्यांनी केली. ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत, असा सवाल करून छगन भुजबळ यांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असा आरोप हाके यांनी केला.
हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस होता. जरांगे यांची कृती समोर आली तर तोंड काळ करावे लागेल, असा इशारा त्यांनी मराठा नेत्यांना दिला. मराठा समाजाला पैशाचा आणि सत्तेचा माज आहे. हेलिकॉप्टरने पैसे वाटले, तरी ओबीसी समाज मतदान करणार नाही, अशी उचकवटणारी टीका त्यांनी केली.
कुणबी नोंदी बोगस आहेत. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले सरकारने सांगावे, असे आव्हान देऊन ते म्हणाले, की महाराष्ट्रात मराठा समाजाने दहशतीचे वातावरण निर्माण केले. बीडमध्ये कोणाची घर आणि कोणाची हॉटेल जाळली, असा सवाल कोरुन आणि तुम्हीच ओबीसी वाद निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला. ईडब्ल्यूएस आरक्षणात दहा टक्क्यांपैकी साडेआठ टक्के लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे. शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणाऱ्या ओबीसी समाजाच्या अन्नात माती कालवू नका. खिरापत वाटल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत, अशी टीका प्रा. हाके यांनी केला.