मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना निवडणूक आयोगाने ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी २५ जून रोजी निवडणूक आयोग अधिसचून जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना दोन जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. तीन तारखेला अर्जांची छानणी होणार आहे. उमेदवारांना पाच तारखेपर्यंच माघार घेता येईल. १२ जुलैला सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल.
विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) हे आमदार निवृत्त होणार आहेत.