नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पंचवटी कॉलेज पाठीमागील रस्त्याने दारूची वाहतूक केली जात असतांना आडगाव पोलिसानी केलेल्या कारवाईत दोन कारसह मद्यसाठा असा सुमारे ५ लाख ३५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार निलेश काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पंचवटी कॉलेज पाठीमागील मार्गाने मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास सापळा लावण्यात आला होता. एकापाठोपाठ येणारा छोटा हत्ती एमएच १५ जेसी २८१४ व होंडा सिटी कार एमएच १९ क्यू ९९११ ही दोन्ही अडवून पोलीसांनी वाहन तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
या कारवाईत दोन वाहनांसह दारूसाठा असा सुमारे ५ लाख ३५ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.