मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात खासगी वीज वितरण कंपनी एमपीसीएल विरोधात सर्व पक्षीयांनी आज कंपनीच्या गेट जवळ धरणे आंदोलन सुरु केले. वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार, विजेच्या दरात केलेली वाढ, वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे यामुळे त्रस्त झालेल्या मालेगाव मधील सर्वपक्षीय नेते, नागरीकांनी भाजपाचे माजी नगरसेवक सुनिल आबा गायकवाड यांच्या नेतृत्वात एकत्रीत येत खासगी वीज कंपनी विरोधात विविध समस्यां विरोधात धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे खासगी वीज वितरण कंपनी आपला कारभार सुधारणार का याकडे आता सर्वांटे लक्ष लागले आहे. वीज वितरण कंपनीने आपला कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.