नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत नाशिककरांचे सुमारे २५ कोटी रुपये खर्च उभारण्यात आलेले नाट्यगृह बंद पडलेले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभी केलेली वस्तू अधीक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराभावी खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तरी हे नाट्यगृह तत्काळ खुले करण्यात यावे अशी मागणी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे विजय राऊत यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि आम्ही अनेकदा कार्यक्रमासाठी नाट्यगृहाची मागणी केली असता अजून त्याबाबत काही निर्णय झालेला नाही असे उत्तर मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. आधी उद्घाटनाची प्रतीक्षा होती आणि आता उद्घाटन झाले पण नाट्यगृह कार्यक्रमासाठी तत्काळ खुले करण्यात करण्यात यावे अशी मागणी केली आहे .पुढील महिन्यात कामाच्या शुभारंभाला पाच वर्ष पूर्ण होणार आहे तरी त्याआधी मनपा प्रशासनाने उपाययोजना करून नाट्यगृह नाशिककरांसाठी व पंचवटीकरांसाठी खुले करण्यात यावे. याशिवाय पंचवटी परिसरातील दुसरे नाट्यगृहाचे नुतनीकरणाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात आलेले आहे ते देखील अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे पंचवटी परिसरातील दोन भव्य अश्या वस्तू बंद पडलेल्या स्थितीत आहे. ते तत्काळ सुरु करावे जेणेकरून मनपाच्या उत्पन्नात भर पडेल शिवाय सामाजिक संस्था ,कलाकारांचा हिरमोड होणार नाही.
मनपा आयुक्तांनी लक्ष घाालावे
पंचवटी परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली वास्तू बंद पडलेली एवढी प्रशस्त आणि भव्य वास्तू बंद ठेवल्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे शिवाय जास्त दिवस बंद राहिल्यास येथील वस्तू खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे तरी यावर मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन तात्काळ मार्ग काढावा.
विजय राऊत,अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभाग.
असे आहे नाट्यगृह ………
पंचवटी हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन १०फेब्रुवारी २०२४ झाले.चार वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहा एकरच्या जागेत २९०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून, आवारात बांधकामाच्या पश्चिमेला वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था आहे. नाट्यगृहात आवश्यक त्या सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून, दोन्ही बाजूला प्रसाधनागृहांची व्यवस्था आहे. दोन्ही मजल्यावर स्वतंत्र दोन तालीम हॉल बांधलेलेआहेत. भव्य रंगमंच, सुसज्ज असा मेकअप रूम आहे. प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे, बाल्कनीत १५० आणि खाली ५०० अशा ६५० आरामदायी खुच्र्यांची आसनव्यवस्था आहे. नाट्यगृह२९०० चौरस मीटर बांधकाम, संरक्षक भिंत, प्रशस्त पार्किंगमध्ये ३४७ चारचाकी, ३४५ दुचाकी, १७४ सायकली पार्क करण्यासाठी प्रशस्त व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूला प्रसाधनगृह, व्हीआयपी रूम, रंगीत तालीम करण्यासाठी दोन हॉल, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा.लेटेस्ट टेक्नॉलॉजीची साउंड सिस्टिम, अत्याधुनिक स्टेज लाइट, स्वयंचलित सरकते पडदे, मुख्य रंगमंच १५ मीटर बाय १० मीटर, तालीम हॉल साडेसात बाय साडेसात मीटर आहे. प्रेक्षकागृहात खाली ५०० आणि बाल्कनीत १५० अशी आरामदायी खुर्च्छा आहेत. संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.