इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे. ते मोठा निर्णय घेणार असल्याचेही बोलले जात आहे. मुंबईत एमईटीमध्ये झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवल्यामुळे या चर्चेला उधान आले आहे. ही चर्चा होण्यामागे अनेक कारण असले तरी अलीकडे भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ही नाराजी समोर आली आहे.
भुजबळांना अगोदर नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली नाही, त्यानंतर ते राज्यसभेसाठी इच्छुक असतांना येथे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली. पण, त्यांनी मी नाराज नाही असाच सूर लावला. पण, सोमवारी त्यांच्या समर्थकांनी ही नाराजी व्यक्त केला.
या नाराजीबरोबरच सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला.. सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे भुजबळ आता या नाराजीतून काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.