इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळ: राहुल गांधी रायबरेलीची जागा राखतील आणि प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतील यावर, राहुल गांधी यांच्याकडून पराभूत झालेल्या सीपीआय नेत्या ॲनी राजा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी आणि काँग्रेसने निर्णय घेतला आहे की ते रायबरेली राखतील आणि वायनाड सोडतील… मी निवडणूक लढवणार की नाही? वायनाडमधून पुन्हा उमेदवार असेल का..हा माझ्या पक्षाचा निर्णय असेल… आतापर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे पक्षात आणि एलडीएफमध्ये उमेदवाराबद्दल चर्चा करण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आम्हाला जास्तीत जास्त महिलांची गरज आहे. संसदेसाठी UDF ने महिला उमेदवाराची घोषणा केली याचा मला आनंद आहे.
ॲनी राजा यांनी राहुल गांधी विरोधात निवडणूक लढवली होती. यात राहुल गांधी यांना ६ लाख ४७ हजार ४४५ तर एनी राजा यांना २ लाख ८३ हजार २३ मते पडली होती. तर भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांना १ लाख ४१ हजार ४५ मते पडली होती. तर सहा उमेदवारांना दोन हजारापेक्षा कमी मते होती.
			








