इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. यावेळी त्यांनी आता पडणार नाही तर पाडणार असे सांगत कार्यकर्त्यांना आगामी राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट केली. मी मनाने कधीच खचले नाही. मला कधीच वाटलं नाही की माझ्या तसूभर काही कमी आहे. मला एकच वाटलं की, तुमच्या सेवेत खंड आला. हात जोडून मी माफी मागते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. हे मंचावरच्या लोकांना तेवढा त्रास होत नसेल. ज्यांना पद-प्रतिष्ठा मिळते त्यांचं भागून जातं. पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो असे त्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या.
यावेळी त्यांनी या सभेतून होणा-या आरोपांचाही समाचार घेतला…माझ्यावर रोज आरोप होतो. कुणी म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कुणी म्हणतं ताई त्या पक्षाच चालल्या, कुणी म्हणतं आम्हाला असं कळलं, कुणी म्हणतं आम्हाला तसं कळलं, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देवून तुम्हाला ती मिळवता आली नाही. पदं न देता निष्ठा काय असते ती या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात झाले, दहा वेळा यांचे स्वप्न तुटले. तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहेत अशी भूमिका त्यांनी मांडली.
या सभेचे संपूर्ण भाषण बघा युट्यूब चॅनेलवर बघा….