इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या शेतात मशागतीच काम सुरू असताना प्रमरबीर सिंग बेदी हा १३ वर्षीय मुलगा रोटॉवेटर मध्ये सापडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या सुमारास गुरुद्वाराच्या मागील शेतात घरातील व्यक्ती रोटॉवेटर मारत असताना प्ररमबीर हा त्यावर बसलेला होता. मात्र अचानक तो खाली पडून त्यात अडकला हे लक्षात येताच त्याला तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.