इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राहुल गांधी हे वायनाड येथील खासदारकीचा राजीनामा देणार असून येथील पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी उमेदवार असणार असल्याचे सांगितले. राहुल गांधी दोन लोकसभा मतदार संघातून निवडून आल्यामुळे ते कोणत्या जागेचा राजीनामा देतात व कोणती जागा राखतात यावर चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांनी रायबरेलीतून आपली खासदारकी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.