इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आगामी विधानसभा निवडणूकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी म्हणून भुपेद्र यादव तर सह-प्रभारी म्हणून आश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आहे.
अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात चांगली कामगिरी व्हावी यासाठी हे दोन्ही नेते नियोजन करणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन पक्षाची आघाडी असलेल्या महायुतीला मोठा धक्का बसला. त्यामुळे भाजपने या दोन्ही नेत्यांवर ही जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच भाजपने हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मिर येथेही अशाच नियुक्त्या केल्या आहे.