इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हयात सिलीगुड़ी उपमंडल अंतर्गत रंगपानी स्टेशन जवळ रुइधासा येते आज एका मालगाड़ीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले आहे. तर रेल्वेचे मागील तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे पोहचले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी चारचाकी गाडी जाणे अवघड व वेळ जास्त लागणार असल्यामुळे त्यांनी थेट मोटरसायकवरुन जाणे पसंद केले.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून २ लाख रुपयांचे आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.
सकाळी नऊ वाजता झाली दुर्घटना
सोमवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याच आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली बचाव कार्याची माहिती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.