नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिळकत हडपण्याच्या उद्देशाने भामट्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वृध्दाच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मंजीतकौर जसपालसिंग चढ्ढा (रा.शिंगाडा तलाव), हरदेवसिंग उजागरसिंग चोटमुराडी (रा.संगमनेर), शरणसिंग गील व करणसिंग गील (रा.दोघे द्वारका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत जतिंदरसिंग हरदितसिंग गुजराल (७० रा.सदगुरूनगर तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. जून २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान जयंती चद्रहास शेट्टी व एमआयडीशी यांचेशी करार करून खरेदी केलेली अंबड औद्योगीक वसाहतीतील प्लाट नं. एच ३ -१ ही मिळकत हडप करण्याच्या उध्देशाने संशयिताने गुजराल यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी विनापरवानगी सदर ठिकाणी प्रवेश केला.
त्यानंतर संशयितांनी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप हा विना तारखेचा खोटा मजकूर असलेला बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून सादर केला. यातून फिर्यादी व न्यायालयाची दिशाभूल करण्यात आल्याचे तक्रारीत नुमद करण्यात आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक आव्हाड करीत आहेत.