नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावरील मेडिकल कॉलेज फाटा जवळील उड्डाणपूलावर दुचाकी अपघातात मुंबई येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अक्षय पांडूरंग गारगोटे (३० रा.उत्कर्ष चाळ, रमाबाई आंबेडकरनगर चौक,घाटकोपर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गारगोटे रविवारी (दि.१६) रात्री मुंबई येथून पिंपळगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मेडिकल कॉलेज फाटा येथील उड्डाणपूलावर दुचाकीस अपघात झाल्याने ते गंभीर अवस्थेत मिळून आले होते. एमएच १५ सीए ८७४६ वरिल चालक सुनिल पवार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.