नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची गंगापूर धरण थेट पाणी पुरवठा योजनेतील रॅा वॅाटर रायझींग मेन ही पाईपलाईन सातपूर येथे लिकेज झाली आहे. नाशिक महानगरपालिकेने तातडीने पंपींग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे अवाहन नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
या दुरुस्तीच्या कामाला किती वेळ लागेल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, दुरुस्तीचे काम पंपींग बंद करुन सुरु असल्यामुळे पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम सुरु असे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.