मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावे आता समोर येऊ लागली आहे. या विस्तारात महायुतीमधील तीन पक्षातील आमदारांना संधी दिली जाणार आहे. २७ जूनला महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्याआधीच मंत्रिमडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमधून आमदार आमदार देवयानी फरांदे यांच्यासह पुण्यातून ३ टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांची नावे भाजपकडून महिला मंत्री म्हणून चर्चेत आहे. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये आमदार नितेश राणेंना, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अतुल भातखळकर, राणाजगजितसिंह पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश धस यांचीही नावे आघाडीवर आहेत.
शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, आशिष जैस्वाल आणि भरत गोगावलेंची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.