इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परीक्षा पे चर्चा’ सारखे दिखाऊ कार्यक्रम करणारे केंद्रातील भाजप सरकार NEET परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
परीक्षेचे पेपर फोडणा-या आरोपींनी दिलेल्या कबुलीमध्ये एक पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी तब्बल ३० ते ३२ लाख रूपये घेऊन फोडल्याची कबुली दिली आहे. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. मात्र जबाबदा-यांपासून पळून जाणं ही पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांची जुनी सवय असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, देशातील २४ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असताना देशाचे शिक्षण मंत्री ही गोष्ट कबूल करायला तयार नाहीत. सरकारचा निगरगट्टपणा इतका आहे की, जोवर माध्यमांमध्ये याची चर्चा होत नव्हती तोवर शिक्षमंत्र्यांनी यावर ब्रसुद्धा काढला नव्हता. विद्यार्थी नीटसाररख्या परीक्षेची तयारी वर्षानुवर्षे करत असतात, मात्र सरकार या परीक्षेच्या पेपरफुटीबाबत जितका हलगर्जीपणा दाखवतंय त्यावरून सरकार या विषयाबाबत किती गंभीर आहे, हे दिसतंय.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘नॅशनल टेस्टींग एजन्सी’ (NTA) ला क्लीन चीट दिलेली. गुजरातमधील गोध्रा सेंटवरवरदेखील नीट परीक्षेचा घोटाळा उघड झालाय. नीट घोटाळ्यांचं कनेक्शनही गुजरातसोबत असणं हा योगायोग कसा असू शकतो?