इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे: सगळीकडे पितृदिवस साजरा होत असताना या दिवसाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली. ‘फादर्स डे’ च्या दिवशी पित्याने चार वर्षीय चिमुकलीला चाकूने चटके दिल्याची संतापजनक प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.
ही घटना ५ ते १४ जून दरम्यानची आहे. चिमुकली शाळेत सतत रडत असल्याने शिक्षकाने पाहिले, तर तिच्या हातावर चटक्यांचे व्रण दिसले. तिला प्रेमाने जवळ घेत शिक्षकाने तिची विचारपूस केली. त्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. आरोपी या चिमुरडीचा सावत्र पिता असून आई आणि सावत्र बाप हे दोघेही मजुरीचे काम करतात. आईने या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दिली नाही; परंतु सावत्र बाप वारंवार चिमुकलीचा छळ करायला लागल्याने आईनेच पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आरोपी बाप लहान मुलीशी अश्लील वर्तन करायचा. अनेक वेळा त्याने चाकू गरम करून चटके दिले. पीडित मुलगी घाबरुन गेली आहे.