इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर चुकीचे परीक्षा सेंटर लोकेशन दाखवण्यात आल्यामुळे २० हून अधिक विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गुगल मॅपमुळे विद्यार्थी चुकीच्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर विद्यार्थ्यांना ही चूक लक्षात आली, तोपर्यंत खूप उशीर झाला आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.
गुगल मॅपमुळे काही घडलं हे आता पुढे आले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जे हॉलतिकीट देण्यात आले होते. त्यावर विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंह वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर असा पत्ता देण्यात आला. मात्र, हा पत्ता गूगल मॅपवर टाकला असता त्याचे लोकेशन थेट वाळूज एमआयडीसीमध्ये दाखवत होते. त्यामुळे विद्यार्थी वाळूज एमआयडीसीमध्ये पोहचले. मात्र, तिथेच गेल्यावर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. यावेळी काही विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता हे परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्येच असल्याचे लक्षात आले. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता. यासर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली.
गुगल मॅपमुळे अनेकवेळा मनस्ताप सहन करण्याच्या या अगोदही घडल्या आहे. पण, आता विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.