इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात ईव्हीएम अनलॉक करणारा फोनची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थितीत केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लबाडी होते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते.
मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात झालेल्या गडबडीविरोधात रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मतदारसंघातील निकाल लागला असला तरी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. त्यावर राहुल गांधी यांची पोस्ट चर्चेत आहे.
नेमकं घडलं काय
पडलीकर यांनी मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला. ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.