इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत अशोक तोडकर (२८) रा. आदर्श नगर रामवाडी असे तरुणाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. ही घटना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत झाली. या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल आहे. तोडकर हा शनिवारी दिवसभर घरी होता, तो रात्री घरा बाहेर पडला होता.
सकाळी आठ वाजता ही घटना भावाला पोलिसांकडून समजली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. प्रशांत हा सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत असे. त्याच्यामागे दोन भाऊ एक बहिण आई वडील असा परिवार आहे.