इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा अध्यादेश काढलात, तरी आगामी निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. ते म्हणाले, की राज्य सरकार ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी सरकारची असेल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही, असा पवित्रा त्यानी घेतला आहे.
जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. याबाबत शेंडगे म्हणाले, की ओबीसी उपोषणाचा हा वणवा राज्यभरात पसरेल. शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावल्यानंतर हाके आणि शिंदे यांच्यात संवाद झाला. शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, अशी हमी दिली. मात्र लेखी आश्वासनाची मागणी हाके यांनी केली.