इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यभर शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी सगळीकडे उत्साह असतांना संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या तीनही मुली मैत्रीण असल्याने शाळा सुटल्यानंतर त्या फिरण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या. शेततळ्यात साचलेल्या पाण्यात तिघीही पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
अनुष्का बडे (११ वर्ष), सृष्टी ठापसे (१३ वर्षे) आणि वैष्णवी जाधव (१२ वर्ष) अशी या मुलींची नावे आहेत. सोमनाथ बढे यांच्या शेतातील अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात या तिघी पडल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बढे यांच्या खासगी शेततळ्याचे काम काही कारणास्तव बंद आहे. शेततळे अर्धवट राहिले आहे. शाळा सुटल्यानंतर फिरत फिरत तीन मुली शेततळ्याकडे गेल्या. ततळ्यात पावसाचे पाणी साचले आहे. खेळत असताना पाण्यात बुडून तिघींचाही मृत्यू झाला.