इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी संख्या मिळाली, त्याचे कारण म्हणजे इंडिया आघाडीने राज्यघटना बदलणार असल्याच्या अफवा पसरवल्या असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेची निवडणूक आम्ही जिंकू असे सांगितले.
यावेळी आठवले म्हणाले की, राज्यात आता काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे सांगतात की निवडणुका संविधान वाचवण्यासाठी आहेत. पण आमचा प्रय़त्न युबीटी शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि राहुल गांधींचा काँग्रेस हटवण्याचा आहे.
आमच्यासोबत २४० पेक्षा जास्त आमदार आहेत. ते त्यांना हवे ते म्हणू शकतात…पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी आम्ही येऊ.