इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातमध्ये २२५०० कोटींची गुंतवणूक करून ५ हजार रोजगार निर्माण करणाऱ्या micron ला केंद्र सरकारने १६००० कोटीचे अनुदान देणं म्हणजे एका नोकरीसाठी ३.२ कोटी रुपये खर्च करणं व्यवहार्य नाही. केंद्रीय मंत्री कुमारस्वामींची ही भूमिका नक्कीच योग्य असून व्यवहार्य भूमिका मांडताना त्यांनी दाखवलेलं धाडस खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प यशस्वी होत नाही हा vedant_foxconn चा अनुभव डोळ्यासमोर असल्याने micron ने केंद्र सरकारकडून ७० टक्के अनुदानाची अट मान्य करवून घेतली आहे. महाराष्ट्राचा पर्याय दिल्यास micron कुठल्याही अनुदानाची अट घालणार नाही. त्यामुळं केंद्र सरकारने गुजरातमध्येच प्रकल्प टाकण्याचा अट्टहास सोडून महाराष्ट्राचा विचार करावा.
एकीकडं कुमारस्वामी हिंमत दाखवतात याचं कौतुक आहेच, पण दुसरीकडं महाराष्ट्राचे हक्काचे प्रकल्प गुजरातला नेले जात असताना महाराष्ट्राचं नेतृत्व मात्र शेपूट घालून गप्प बसलं, याचं दुःख नक्कीच आहे. असो! कुमारस्वामी यांच्यासारखं धाडस महाराष्ट्राच्या नेतृत्वातही येईल ही अपेक्षा!