नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आदिश्री अविनाश पगार या विद्यार्थिनीने दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आदिश्री पगारला भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आदिश्री पगारचे वडील अविनाश पगार, आई अंजली पगार यांच्यासह कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. अन्न वाचवण्याची मोहीम, पाणी वाचवा, वृक्ष संवर्धन, हवा प्रदूषण यासह विविध सामाजिक विषयांवर आदिश्री पगार घेणे आत्तापर्यंत सहा वेबसाईट, पाच मोबाईल ॲप्स बनवले आहे. तसेच एक पुस्तक देखील लिहिले आहे. तिच्या या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून आत्तापर्यंत तिच्या नावावर दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदविण्यात आले आहे. तिच्या या यशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी आदिश्री पगार व तिच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.