इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मी २२ जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटले होते की, भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे असे सांगत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला.
मुंबईत आज महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी विचारलेल्या नेरिव्हिट सेटच्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झाले. १५ लाखाचं काय झाले. २०१४ पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केले. असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे.
बघा संपू्र्ण पत्रकार परिषद….