इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.