इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहे. पहिल्याच फटक्यात अमेरिकेने सुपर ८ फेरीत धडक मारली तर दुसरीकडे पाकिस्तानचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर ८ फेरीसाठी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. आयसीसीच्या नियमानुसार अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. त्यामुळे अमेरिकेला फायदा झाला.
अमेरिकेच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर कॅनडाला धुळ चारली व भारतालाही विजयासाठी झुंजवलं. त्यानंतर आता अमेरिकेने सुपर ८ फेरीत धडक मारली आहे. गुणतालिकेत पाच गुण मिळवून भारतानंतर सुपर ८ फेरीत स्थान मिळवणारा अ गटातील दुसरा संघ ठरला आहे. या पावसामुळे पाकिस्तानचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.
अ गटातून पाकिस्तान व्यतिरिक्त कॅनडा आणि आयर्लंडचंही आव्हान संपुष्टात आले आहे. गेल्यावेळेस टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण, इंग्लंडने त्यांचा पराभव केला होता. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतचं आव्हान संपुष्टात आले आहे. तर पहिल्याच झटक्यात अमेरिकेने सुपर ८ फेरीत धडक मारली आहे.
अमेरिकेचे सामन्यापूर्वी चार गुण होते. सामना रद्द झाल्यामुळे एक गुण मिळाले. त्यामुळे पाच गुण झाले. पाकिस्ताने जरी अखेरचा सामना जिंकला असता तरी चारच गुण झाले असते. त्यामुळे सामना खेळण्यापूर्वीच पाकिस्ताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला.