इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गजा हा कुख्यात गुंड असून त्याच्या घरी जाऊन खा. लंके यांनी त्याची भेट घेतल्याने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुणाच्याही घर जातांना नेत्यांनी अवश्य विचार करावा कारण हजारो कार्यकर्ते जनता फॅालो करत असते. खासदार निलेश लंके यांनी माफी मागितली आहे. मी देखील पक्षाच्या वतीने माफी मागतो असे त्यांनी सांगितले. आमच्यातला एक खासदार चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेलो, ते जायला नको होते असेही त्यांनी सांगितले.
खा. लंके यांनी आज कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी घेतली. गजा मारणेने खा. लंके यांचा सत्कार केला. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी गजाची भेट घेतल्याने मोठा गदारोळ झाला होता. त्या वेळी अजितदादांनी पार्थला फटकारले होते. त्यानंतर ही भेट झाल्याने त्यावरही आता टीका होऊ लागली आहे. या भेटीवर अजित पवार गटाने बारामती अथवा अहमदनगर लोकसभामध्ये ज्या घडामोडी घडल्या, गुंडाचा वापर झाला, त्यात गजाचा पाठिंबा होता का, असा सवाल केला आहे.
गजा मारणेचे मूळ गाव मुळशी तालुक्यात असून तो मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये न्यायालयाने त्याला शिक्षा दिली होती. गजा तीन वर्षे येरवडा कारगृहात होता.