नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वादातून घेऊन गेलेल्या स्कोडा कारमधील साहित्य चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिषा वळवी, विकास वानखेडे, प्रविण वानखेडे व कांचन वानखेडे अशी कारमधील साहित्य लांबविणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सविता बापू जाधव (रा.जाधव मळा,न्यु इग्लिश स्कूल जवळ,आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव व संशयितांमध्ये आर्थीक वाद होता. २३ मे रोजी रात्री आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून संशयित जाधव यांची स्कोडा फॅबिया कार एमएच ०२ बीजे ८८७० घेवून गेले होते.
त्यानंतर व्यवहाराचा वाद मिटल्याने संशयितांनी कार परत केली मात्र कारमधील सुमारे ३ हजार ६५० रूपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.
………