नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पाठलाग करीत परिचीताने एका तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने शिवीगाळ केल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबक बजरंग वैराळ (३० रा.ओम रेसि.ध्रुवनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून, गेल्या दोन वर्षापासून तो पाठलाग करीत रस्ता अडवून युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. संशयिताने इन्स्टाग्राम या सोशल साईडवर बनावट अकाऊंट तयार करून तरूणीचे फोटो अपलोड केले.
तसेच तिला अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग केला. याबाबत तरूणीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने शिवीगाळ केल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.