नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. या शिबिरा ६९ जणांनी रक्तदान केले. या शिबिराला अधिकारी व कर्मचा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगीतले.
या शिबिरासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल निकम, वैशाली आव्हाड, शोभा पुजारी, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, सुधीर सातपुते नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुषार उत्तम नागरे, पदाधिकारी योगेश नाईक, अमोल हांडगे, अरुण तांबे, अजय पवार विलास कनोजे, गणेश गायकर, वसंत पांडव, शरद झोमन, मनोज पिंगळे, राजेंद्र पाबळे, गणेश लीलके,संतोष तांदळे, भगवान काकड, दीपक सोमण, विनोद बागुल, विनायक जाधव, सचिन शिरसाठ, प्रमोद चव्हाण, रतीलाल सोनवणे, शांताराम मोंढे,किरण देवरे, हेमंत पोटींदे, नितीन शिरसाठ, तुषार सुर्यवंशी, अरुण पालवी, आनंद शंखपाल, अविनाश केंग, अनिल रोकडे, सागर शेलार, योगेश वाघ, विकास अहिरे,अर्चना देवरे, रेखा काळे, अमृता सूर्यवंशी, सोनाली मंडलीक, दीपाली घुगे, जुबेदा पटेल, उषा बाविस्कर, धनश्री कापडणीस, जयश्री गायकवाड, संघटनेचे सल्लागार पप्पू देशपांडे इत्यादींनी उपस्थित राहून रक्तदान केले.