इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२५ हजार कोटी रुपयांच्या कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे कोर्टात आव्हान देणार आहे. या प्रकरणात अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांच्यासह अनेक आरोपी नेत्यांना क्लीन चीट दिली आहे. या प्रकरणात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना दिलासा मिळाला होता. हा दिलासा देतांना आर्थिक गुन्हे शाखेने कोणतेच पुरावे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यावर चांगलीच टीका केली होती.
या शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. २९ जूनला या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे.