इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी जाहीर केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेने चांगलाच संताप व्यक्त केला. केतकीने एक व्हिडिओ शेअर करुन शिंदे सरकारवर टीका केली आहे.
या व्हिडिओमध्ये केतकीने म्हटले आहे की, इतकी धक्कादायक बातमी वाचून काय बोलावं कळत नाही आहे. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिले नाही त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही १० कोटी रुपये देत आहात. तुम्ही बधीर आहात की आम्हाला बधीर करुन सोडणार आहात. मी नेहमी म्हणत होते की, लोकसभा निवडणुकीत कोणाला मत द्यायचं हे ठरलं आहे. कारण मला माझा पंतप्रधान कोण हवा आहे हे पाहून मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी पूर्वीपासून बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करुन सोडलं आहे. वक्फ बोर्डाला रद्द करा यासाठी मोर्चे निघत आहेत आणि तुम्ही त्यांना १० कोटी रुपये मंजूर करत आहात. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? तुमचं म्हणणं काय आहे? असा सवाल केतकी चितळेने केला आहे.
बघा संपूर्ण व्हिडिओ