नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सीडॅक अॅक्ट्स पुणे मार्फत विविध पीजी डिप्लोमा कोर्सेस देशभरात चालवले जातात. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी सीडॅकने पीजीडॅक, पीजी डीबीडीए, पीजी एआय इत्यादीसारखे १४ वेगवेगळे सहा महिने मुदतीचे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. सीडॅक कोर्स नंतर अनेक चांगल्या पॅकेजची संधी उपलब्ध झाल्यामुळे इंजिनिअरिंग, एम.एस.सी, एम.सी.ए ही पदवीत उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी या कोर्सकडे आकर्षित झाले आहेत.
सीडॅक ऑगस्ट २०२४ या बॅचच्या प्रवेशासाठी ६ आणि ७ जुलै २०२४ रोजी सीकॅट ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी २६ जून २०२४ ही शेवटची मुदत आहे. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी सीडॅकच्या cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मेट बीकेसी नाशिक येथे 8329487991 या नंबरवर संपर्क साधावा.