इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगड : गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात हृदयविकार तथा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज विजयादशमीचा सण, कालच नवरात्रोत्सव संपला. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवसात गुजरात राज्यामध्ये गरबा खेळताना अति श्रम आणि हार्टबीट्स वाढल्याने सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात वेगवेगळी कारणे सांगण्यात येत असली तरी त्यापैकी निम्म्या स्त्री पुरुष आणि तरुण-तरुणींचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. त्यातच गेल्या काही देशांमध्ये पंजाब व हरियाणा मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच हरियाणामध्ये एका तुरुंगाधिकारी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.
पानीपत कारागृहाचे डीएसपी जोगिंदर देसवाल (५२) जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे तुरुंग खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. देसवाल हे कर्नालच्या न्यायपुरी भागात राहत होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पहाटे जिममध्ये व्यायाम करत असतांना ते अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर पानिपत पोलीस प्रशासनासह हरियाणा पोलिसांनाही धक्का बसला आहे.
जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले.