माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१– कालचा पाऊस
काल बुधवार दि.१२ जूनला महाराष्ट्रात अधिक पाऊस झालेल्या मुख्य ठिकाणच्या पावसाच्या सेमी. मधील नोंदी अश्या – रत्नागिरी ७, गुहागर, संगमेश्वर, देवरुख प्रत्येकी ७, दौंड ७, गगनबावडा ६, अहमदनगर ६, श्रीरामपूर(बेलापूर) ५.
२-मान्सूनची मजल कोठपर्यंत ?
महाराष्ट्रात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा आज जाग्यावरच स्थिरवलेली असून मान्सून आज गुजराथ मधील नवसारी, खान्देशातील जळगांव पर्यन्त आहे तेथेच असुन उर्वरित गुजराथ व खान्देश मध्ये त्याची पुढे प्रगती झालेली नाही. तर बं. उपसागरीय शाखा मात्र काहीशी पुढे सरकली असुन विदर्भातील अकोला, पुसद, शहरे ओलांडून अमरावती, चंद्रपूर ह्या शहरांपर्यन्त त्याची अल्पशी प्रगती झालेली जाणवते. येत्या ४८ तासात मान्सून उर्वरित खान्देश, पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भात पोहोचण्याची अपेक्षा करू या!
३- महाराष्ट्रातील ह्या आठवड्यातील भागवार पावसाची स्थिती काय?
(i)मुंबईसह कोकण व विदर्भातील(७+११=) १८ जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाडा व खान्देशसहित नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या एकूण (८+३+७=)१८ जिल्ह्यात उद्या, शुक्रवार दि.१४ जून पासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि.१८ जून पर्यन पावसाचा जोर काहीसा कमी होवून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १८ जून नंतर वातावरणीय स्थिती पाहूनच पावसाची पुढील स्थिती व्यक्त करता येईल.
(ii) मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यातही ह्या आठवड्यादरम्यान म्हणजे गुरुवार दि २० जूनपर्यंत मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी, मध्यम तर उर्वरित ठिकाणी तुरळक वळीव स्वरूपातील किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
५-महाराष्ट्रातील पावसासाठी अनुकूल/ प्रतिकूल वातावरणीय स्थिती काय?
अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे बळकट मान्सूनी वारे वाहण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली सध्या जाणवत नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.