नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मालेगाव जवळील दाभाडी रस्त्यावरील रोकडोबा नगर जवळ असलेल्या एका लाकडाच्या वखारीत काम करणा-या कामगाराने लाकडू कापण्याच्या मशिन मध्ये आपले डोके ठेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडीस आली.
ही घटना समजताच वखारीत काम करणा-या अन्य कामगारांनी धाव घेत याची माहिती वखार मालकाला दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोकुळ पवार असे आत्महत्या करणा-या कामगाराचे नाव असून त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी त्याचे धड व मुंडके पोस्टमार्टम साठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.