नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील राऊ हॉटेल भागात राहणा-या ४९ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मधुकर जगन्नाथ जाधव (रा.दिव्या अपा.राऊ हॉटेल मागे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मधुकर जाधव यांनी मंगळवारी (दि.११) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरता पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मेव्हणे मकरंद शिरके यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.