इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कुवेतमध्ये एका इमारतीत लागलेल्या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४१ भारतीय असून बुधवारी सकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत ३० भारतीय मजूर जखमी झाले आहे.
कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतामधील मंगाफ येथे सहा मजली इमारत आहे. येथे ही आग लागली. या इमारतीत कामगारांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. मोठ्या संख्येने कामगार इथे राहत होते. या इमारतीच्या किचनमध्ये आग भडकली. या इमारतीत जवळपास १६० लोक राहत होते. ते एकाच कंपनीचे हे सर्व कर्मचारी होते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुद्धा आगीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. आगीच्या या घटनेबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ५० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अजून या संदर्भात काय माहिती मिळेतय त्याची प्रतिक्षा करत आहोत. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, यासाठी प्रार्थना करतो. आमच्या दूतावासाकडून सर्व संबंधितांना आवश्यक मदत मिळेल” असं एस जयशंकर यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.