इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या हवाई दलाच्या मध्यम उंचीवर उड्डाण करणारी हेलिकॉप्टर्स (एमआय – 17 व्हेरिएंट), हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठीची हेलिकॉप्टर्स (चेतक) आणि स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठीची हेलिकॉप्टर्स (Advanced Light Helicopters – ALH) ध्रुव अशा अनेक प्रकारच्या हेलिकॉप्टर्सची मोठ्या प्रमाणात उड्डाणे केली गेली आहेत.
मतदानाच्या सात पैकी पाच टप्प्यांच्या कार्यान्वयामध्ये भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या काळात हवाई दलाने १००० पेक्षा जास्त तासांची १७५० पेक्षा जास्त उड्डाणे केली. या मोहिमा प्रचंड आव्हानात्मक होत्या, मात्र भारत निवडणूक आयोग आणि विविध राज्यांमध्ये नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिथल्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत समन्वय राखून काम केल्याने या आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या.
निवडणुकीच्या काळात हवाई मार्गाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे घेऊन जाणे आणि येणे, निवडणूक सेवेसाठी तैनात केलेल्या निवडणू आयोगाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हवाई मार्गाने ने आणि करणे अशा अनेक मोहीमांमध्ये भारतीय हवाई दल सक्रियपणे सहभागी झाले होते. भारतीय हवाई दल मागच्या वेळी झालेल्या सार्वत्रिक / विधानसभा निवडणुकांदरम्यानही अशाच प्रकारची जबाबदारी पार पाडली होती. लोकसभा निवडणूक – 2024 च्या काळात देशाच्या अत्यंत दुर्मग भागांपर्यंत, तसेच ज्या ठिकाणी रस्त्याने होणारी वाहतूक करणे ही सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब होती अशा अनेक ठिकाणी भारत निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि साधन सामग्री पोहचवण्यात देशाच्या हवाई दलाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. ही संपूर्ण मोहीम काटेकोर कालमर्यादांची होती, कारण मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येक दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखेच्या दोन दिवस आधी पोहचवून तैनात करणे, आणि मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया संपल्यावर लगेचच त्यांना तिथून पुन्हा निश्चित कालमर्यादेतच माघारी आणणे बंधनकारक होते.