इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – नाशिक जिल्हयात पुन्हा साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याने हा साठा सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातील गिरणा नदीपात्रात फेकला होता. हा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ३ ते ४ तास अंडर वॉटर हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने १५ फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात हे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले व ते अजूनही सुरुच आहे. त्याचप्रमाणे देवळाजवळच्या सरस्वतीवाडी भागातून देखील पोलिसांनी १५ किलो ड्रग्स जप्त केले आहे.
सचिन वाघने तब्बल दोन गोण्या भरून ड्रग्सचे पॅकेट नदीपात्रात फेकले. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रीतून हे सर्च ऑपरेशन सुरु केले. जप्त करण्यात आलेल्या ४० ते ५० किलो ड्रग्सच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १०० कोटींच्या आसपास आहे.
ललिल पाटील याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याअगोदर पोलिसांनी त्याला रविवारी नाशिकला आणून कसून चौकशी केली. त्यानंतर सोमवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर पुन्हा २७ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. साकीनाका पोलिसांनी याअगोदर नााशिकच्या काऱखान्यावर ३०० कोटीचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यासह १६ जणांना अटक केली. या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत असून त्याचा संपूर्ण तपास आता पोलिस करणार आहे.
ललित पाटील प्रकरणाता पोलिस कोठडी मागतांना ससून रुग्णालयातातून त्यांच्या सांगण्यावरुन त्याचा भाऊ भूषण पाटील सोबत ड्रग्जचा कारखाना चालवत होता. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली. हे मोठं रॅकेट आहे. त्यात आणखी आरोपीचा सहभाग आहे. या प्रकरणात ललित पाटील, भूषण पाटील व सचिन वाघ या सर्वांची समोरासमोर चौकशी करायची आहे असे कारण देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ललित पाटील याला २७ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्यानंतर आज पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.