येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येवला तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात बिनविषारी धामण जातीचा सर्प आढळून आल्याने कार्यालयातील कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली. साप साप करत सर्व कर्मचारी कार्यालया बाहेर पळाले. त्यानंतर सर्प मित्राला बोलविण्यात आल्यानंतर त्याने शिताफीने धामणला पकडत बरणीत जेरबंद केले. त्यामुळे सर्व कर्मचा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान या धामणला पकडल्यानंतर तिला निर्सगाच्या सानिध्यात सोडण्यात आले.