नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा)– जेलरोड परिरातील सेंट फिलोमिना शाळा भागात दुचाकी अपघातात जखमी झालेल्या ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनोद रामसिंग राजपूत (रा.इंदिरा गांधी पुतळयाजवळ,नारायण बापू नगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. राजपूत मंगळवारी (दि.११) रात्री बिटको चौकाकडून जेलरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सेंट फिलोमिना शाळा भागात ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले मिळून आले होते.
या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने व नाकातून रक्त येत असल्याने भाचा विक्की राजपूत यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक झाडे करीत आहेत.